मूळव्याध वर घरगुती उपाय
मूळव्याधाला मराठी मध्ये “अर्श” असे ही म्हटले जाते. अर्श काय आहे? ज्या आपल्या गुद्द भागामधील आलेला एक मांस अंकुर असतो आणि तो मांस अंकुर सुजलेला असतो आणि तिथे रक्त शाकाळलेल्या पद्धतीने रंग बदलतात आणि तो काहीसा जांभळा ही असतो. यामुळे ते गुद्द भागातून किंवा संडास च्या जागेतून ज्यावेळी डेफीगेशन प्रोसेस होते त्या वेळेस खूप त्रास होतो अश्या, स्थितीला आपण अर्श असे म्हणतो यालाच, इंग्रजी मध्ये “Anal Fistula” असे म्हणतात. मूळव्याधेच्या समस्येचा खूप त्रास होतो आणि याला मुळापासून संपुष्टात आणणे खूप कठीण होऊन जाते आपण याची लक्षणे, घरगुती उपाय ह्या लेखातून जाणून घेऊया.
मूळव्याधाची लक्षणे
१) मुळव्याधाचे सर्वात प्राथमिक लक्षण म्हणजे शौच करताना शौचाचे ठिकाणी आग होणे किंवा त्या ठिकणी सुई टोचल्यासारखे वाटणे.
२ ) शौचाच्या ठिकाण वरून रक्त येणे.
३) शौचाच्या ठिकाणी सूज येणे
४) शौच करताना खूप वेदना होणे
मूळव्याध वर घरगुती उपाय
१) मूळव्याध मध्ये जर रक्त प्रवाह अति होत असेल तर सर्वात सोपा उपाय आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात असलेल्या कॉमन पदार्थ मध्ये सुद्धा आपण त्याच्यावर उपचार करू शकतो तर, त्या साठी लागणारी प्रथम वस्तू म्हणजे लिंबू आणि दुसरे सेंध मीठ. या २ कॉमन वस्तू आपल्या सर्वांच्या घरात कायम असतात. लिंबू या पदार्थाला आयुर्वेद मध्ये विशेष महत्व आहे आणि मित्रांनो, दुसरा जो पदार्थ आहे तो सेंध मीठ…. मीठ वापरताना ते काळ मीठ नसावं आणि सफेद आयोडीन युक्त मीठ तर, आजिबात वापरू नये . मीठ हे सेंध मीठ च असलं पाहिजे… सेंध मीठ हे व्यवस्थित बारीक कुटून घ्यावे. एका लिंबाचे दोन भाग करून अर्ध्या भागावर थोडं सेंध मीठ टाकून ते चार ते पाच वेळेस जिभेने चाटायचे…. आणि असा प्रयोग चार ते पाच वेळेस करावे दिवसातून सकाळी चार पाच वेळेस आणि संध्याकाळी चार पाच वेळेस करावे… मित्रानो हे चाटण जेव्हा आपण चार पाच वेळेस करतो लगेचच आपला रक्त प्रवाह बंद होतो. हा उपाय घरघुती उपाय मधला सर्वात प्रभावी उपाय आहे.
२) मूळव्याध वर घरगुती उपाय दुसरा तर, अर्धा वाटी जिरे घ्या. हे अर्धे वाटी जिरे आपण तव्यावर चांगले भाजून घ्या आणि अर्धी वाटी जिरे हे कच्चे घ्या दोन्ही व्यवस्थित एकत्र करून मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्या. यानंतर एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि ते कोमट करा. हे पाणी अधिक कोमट होता कामा नये म्हणजे अधिक गरम करायचे नाही. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिऱ्याची पूड घ्या. ती व्यवस्थित ढवळून घ्या आणि ते मिश्रण २ ते ३ मिनिटे तसेच ठेवा आणि हे मिश्रण पिण्याची योग्य वेळ सकाळी उपाशी पोटी घ्या तसेच रात्री झोपतांना जेवण झाल्यानंतर एका तासाच्या गॅप ने घ्यावे. हे मिश्रण मुळव्याधावर अत्यंत गुणकारी असून त्याचे शरीराला अजून ही बरेच फायदे आहेत जसे की, या मिश्रणाने पोटाचे विकार, पचन, गॅस समस्या, स्थुलत्व यावर हे प्रभावी ठरते.
३) मूळव्याध वर घरगुती उपाय तिसरा तर, तुम्ही एक पेरू घ्या त्याचे चार भाग करा आणि त्याला सेंध मीठ लावून ते चावून खा पण, हा उपाय करतांना ज्यांना किडनी स्टोन चा आजार असेल त्यांनी पेरू मधील बिया काढून मगच हा उपाय करावा तसेच, ज्यांना पेरू खाल्ल्याने सर्दी होत असेल त्यांनी लिंबाचा वापर केला परी चालेल. यामुळे आपले पोट पूर्णपणे साफ होऊन मुळव्याधावर लगेचच फरक जाणवेल. हा उपाय सकाळी उपाशी पोटी केल्याने अधिक लाभदायक राहील.
४) मूळव्याध वर घरगुती उपाय चौथा तर, एक पिकलेली केळी घ्या. त्याचे चार लहान तुकडे करा त्यामध्ये देशी कापूर/ गावठी कापूर घेऊन त्याची पूड करा आणि एक चिमूटभर पूड त्या केळी च्या तुकड्यांवर टाकून ती केळी खा परंतु, हे लक्षात असू द्या की, ही पूड चिमूटभरच असावी. हा उपाय तुम्ही सकाळी उपाशी पोटी करू शकतात.
५) मूळव्याध वर घरगुती उपाय पाचवा तर, डिंकाची रवी. कथल्या डिंक घ्या. हा डिंक कुठल्या ही आयुर्वेदिक दुकानात भेटेल. एकदम थोडासा डिंकाचा भाग घ्या अगदी चण्याच्या आकाराचा आणि तो कुटून त्यामध्ये गावठी तूप टाकून तो डिंक आणि तूप एकत्र करून खा. हे आपण सलग पाच दिवस केले पाहिजे याचा उत्तम फायदा मूळव्याध वर होतो.