खोकल्यावर घरगुती उपाय
फुप्फुसातील श्वासनलिकेच्या आतल्या आवरणाच्या पेशीमधून सतत चिकट द्राव पाझरत असतो. त्याला ‘श्लेष्मा’ असे म्हणतात. श्वासातून आत आलेले धूळीचे कण श्लेष्माला चिकटतात. श्लेष्मा आवरणाला सूज आली तर श्लेष्मा द्राव जास्त प्रमाणात पाझरतो. त्यामुळे श्वासाला अडथळा येतो. हा श्लेष्मा किंवा कफ बाहेर काढून टाकण्याच्या क्रियेला खोकला असे म्हणतात. खोकला कोणत्या ही वयामध्ये येऊ शकतो. मराठीत खोकल्यावर घरगुती उपाय वाचा-
खोकला ही शरीराची संरक्षण यंत्रणा आहे. श्वासातून आत गेलेला कोणताही पदार्थ धुळीचा कण, जिवाणू किंवा विषाणू खोकल्यामुळे बाहेर फेकला जातो. शस्रक्रिया झाल्यानंतर, छातीला मार लागल्यानंतर किंवा न्युमोनियामध्ये खोकला येत नसेल तर गंभीर परिस्थिती निर्माण होते.
लक्षणे
खोकताना आधी दीर्घ श्वास घेतला जातो. नंतर पडजीभ बंद होऊन स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे छातीतला दाब वाढतो. मग अचानक पडजीभ उघडते आणि आतील हवा कफासकट जोराने बाहेर पडते. कफासोबत घशाला त्रास देणारा एखादा कणसुध्दा बाहेर पडतो.
छातीत कफ जमण्याची लक्षणे
- अधिक खोकला
- खोकलतांना घरघर आवाज येणे
- वाहते नाक/सर्दी
- खोकल्यामुळे छातीत दुखणे
- काही गंभीर स्थीतीमध्ये खोकल्यानंतर कफा सोबतच रक्त ही येते
कारणे
घशाला किंवा स्वर यंत्राला सूज आली असेल तर खोकला येतो. अपचनामुळे सुध्दा खोकला येतो. वातावरणात बदल झाला तर छातीत कफ वाढतो. पण खोकल्याचे मुख्य कारण आहे श्वासनलिकेमध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठणे. खाण्या-पिण्याचे पथ्य नसल्याने हे पदार्थ साठतात. थंडीमध्ये पाव, मांसाहार, साखर, गोड पदार्थ जास्त खाल्ले जातात. हे पदार्थ कफ वाढवणारे असतात म्हणून, या काळात खोकला येतो. थंडीमध्ये अंगावर उबदार कपडे असतात. त्यामुळे त्वचेला मोकळी हवा मिळत नाही. त्यामुळे विषारी पदार्थ त्वचेतून बाहेर पडू शकत नाहीत.
खोकला येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे इन्फेक्शन होय. व्हायरल इन्फेक्शन जसे, की सर्दी आणि ताप यामुळे ही खोकला येतो. एसिड रिफ्लक्स हे एक खोकल्यासाठी कारण असू शकते. जर एसिड रिफ्लक्स असेल तर, बाळामध्ये इतर लक्षणे सुद्धा दिसून येतात. ज्यावर लक्ष देणे अनिवार्य होऊन बसते. अस्थमा सुद्धा खोकल्या च्या मागीलच कारण आहे. त्याचे निदान करणे जास्त कठीण असते. कारण, प्रत्येक व्यक्तीमध्ये वा बाळामध्ये याची लक्षणे वेगवेगळी दिसतात. परंतु, अशी काही लक्षणे आहेत जी अस्थमासाठी सामान्य मानली जातात जसे की, खोकताना घरघर आवाज येणे, खासकरून रात्रीच्या वेळी जास्त आणि जोरात खोकला येणे. ऍलर्जी आणि साइनसाइटिस सुद्धा खोकल्याची कारणे आहेत.
सतत खोकला येण्याची कारणे
- अस्थमा (Asthma causes)
दमा, फुफ्फुसाचा एक सामान्य आजार असून जळजळ आणि वायु मार्ग अरुंद करतो. यामध्ये कफ वाढल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. दीर्घकाळ पर्यंत खोकला हे या स्थितीच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. ऋतू आणि इतर घटकांवर अवलंबून दम्याच्या लक्षणांची तीव्रता बदलू शकते.
व्हायरल संसर्ग (Viral Infection)
तुम्हाला कोणत्या ही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर, तुमचा सततचा खोकला हे त्याचे परिणाम असू शकते. फ्लू, न्यूमोनिया इत्यादी इन्फेक्शन मध्ये खोकला, थकवा या सारखी लक्षणे बरे झाल्यानंतर ही कायम राहू शकतात.
पोस्टनेजल ड्रिप (Post nasal drip)
कफ जास्त प्रमाणात जमा झाल्यास घसा खवखवू लागतो. यामुळे चिडचिड आणि सतत खोकला होऊ शकतो. त्याला अप्पर एअरवे कफ सिंड्रोम असे ही म्हणतात.
पचन संबंधी समस्या (Digestion Issue)
हे तुम्हाला आश्यर्चकारक वाटेल पण पचन समस्यांमुळे सतत खोकला जाणवू शकतो. (जीईआरडी), ज्याला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स समस्या किंवा फक्त ऍसिड रिफ्लक्स असे ही म्हणतात, हा एक असा आजार आहे जो पोटातून अन्ननलिके मध्ये गॅस्ट्रिक ऍसिडचा प्रवाह बिघडवते. त्यामुळे घसा खवखवतो आणि सतत खोकला होतो.
खोकल्यावर घरगुती उपाय
अदरक चहा: अदरक चहामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर, सामान्य सर्दी आणि खोकला देखील बरा होण्यास मदत मिळते. अदरक चहामुळे नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे या पासून आराम मिळतो. शिवाय श्वसनमार्गातून घाण देखील बाहेर पडते.
लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण: सामान्य सर्दी आणि खोकलासाठी अजून एक प्रभावी उपाय म्हणजे लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण होय. हे सिरप प्रभावीपणे सर्दी आणि खोकला ठीक करते.
कोमट पाणी: वारंवार कोमट पाणी पिल्याने सामान्य सर्दी आणि खोकला यांच्या विरुद्ध लढण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने गळ्याची सूज देखील कमी होते.
दूध आणि हळदी: सर्व भारतीय स्वयंपाकघरात सापडणारा एक आवश्यक घटक म्हणजे हळद. हळदी एक अँटिऑक्सीडेंट आहे ज्यामुळे आरोग्याला यामुळे बरेच फायदे होतात. झोपण्याच्या आधी एक ग्लास गरम हळद दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो.
मीठाच्या पाण्याने गुळण्या: हा अतिशय जुना औषधोपचार आहे .जो खोकला आणि सर्दी प्रभावीपणे कमी करण्यास मदत करतो. या खारट पाण्यात हळद घालणे देखील फायद्याचे आहे.
मसाल्याचा चहा: आपल्या चहामध्ये तुळस, आले आणि काळी मिरीची पावडर घालून चहा बनवा. या मसाल्याच्या चहामुळे खोकला आणि सर्दी बरी होते.
आवळा: आवळ्यामध्ये मजबूत रोगप्रतिकारक क्षमता असल्याने तो बऱ्याच आजारांविरोधात लढतो. यकृताचे कार्य सुरळीत करण्यासाठी आणि रक्त भिसरण सुरळीत करण्यासाठी आवळा गुणकारी आहे.
अद्रक आणि तुळसीचे मिश्रण: अदरकचा रस काढून त्यात तुळशीची काही पाने घाला आणि त्यात मध घालून ते मिश्रण घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.
गाजर रस: सामान्य सर्दी आणि खोकला असेल तर त्यावर हा घरगुती उपाय उत्तम आहे. गाजरचा रस प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला बरा होण्यास मदत मिळते.
पुदिना आणि तुळस: या दोन्ही गोष्टी खोकला घालविण्यासाठी उपयुक्त आहेत. यासाठी 10 ते 15 पुदिन्याची पाने घ्या. त्यामध्ये तेवढीच तुळशीची पाने टाका. एक ग्लासभर पाण्यात पाने चांगली उकळून घ्या. पाणी उकळून अर्धा ग्लास झाले की, त्यात गुळाचा छोटा खडा टाका आणि हा काढा गरम गरम पिऊन घ्या. रोज रात्री काही दिवस हा रस नियमित घेतला तर, नक्कीच खोकला बरा होईल.
गरम पाण्याची वाफ: सर्दी खोकल्यामुळे कधी-कधी आपल्याला श्वास घेणे देखील अधिक कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच, चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अथवा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
ज्येष्ठमध: मधाप्रमाणेच ज्येष्ठमध देखील खोकल्यावरचा प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही जेष्ठमधाची काडी नियमितपणे चाेखू शकतात किंवा मध आणि ज्येष्ठमध याचे चाटण घेऊ शकतात. हे चाटण तयार करण्यासाठी एक चमचा मध घ्या. त्यामध्ये 2 चमचे ज्येष्ठमधाची पावडर टाका. हे चाटण खाऊन घ्या.
लवंग आणि मध: खोकला आल्यावर नुसती लवंग खाण्यापेक्षा लवंग आणि मध हे मिश्रण एकत्र करून खा. हा उपाय करण्यासाठी लवंग भाजून घ्या. लवंग भाजण्यासाठी त्या गॅसच्या बर्नरवर ठेवा आणि गॅस पेटवा. अवघ्या 5 – 6 सेकंदात लवंग चांगल्या भाजल्या जातील. त्यानंतर या लवंगा हातानेच थोड्या जाड्या भरड्या चुरून घ्या. त्यात थोडे मध टाका आणि ते चाऊन चाऊन खा.
संत्री: खोकला जर जास्त असेल तर, तो कमी होईपर्यंत संत्र्याचा रस घेऊन लंघन करावे. संत्र्याच्या रसात निम्मे पाणी टाकून सकाळी आठ पासून रात्री आठ वाजे पर्यंत दर दोन तासांनी संत्र्याचा रस द्यावा. याच काळात कोमट पाण्याचा एनिमा द्यावा.
नंतर आणखी सात दिवस ताजी फळे खावी. उदा. सफरचंद, पेअर, द्राक्षे, संत्री, अननस, पीच. टरबूज इत्यादी फळे खावी. फलाहारानंतर सॅलड, वाफवलेल्या भाज्या, फळे असा संतुलित आहार सुरू करावा. रुग्णाने साखर, चहा, कॉफी, लोणची, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत.
खोकल्यावर घरगुती उपाय करून बघावे. सर्वात गुणकारी आहेत ती द्राक्षे. ते बल देते आणि कफ मोकळा करतात. साधा खोकला असेल तर द्राक्षाचा रस मध घालून प्यावा.
बदाम: खोकल्यासाठी बदाम गुणकारी आहेत. थोडे बदाम एक तासभर पाण्यात भिजत घालावे. नंतर साल काढून ते बदाम खावे. 20 ग्रॅम बदामाची पेस्ट लोण्याबरोबर दिवसातून दोन वेळा खावी. बदामामध्ये प्रथिने आणि अमायनोआम्ले असतात. बदाम खोकल्यावर उपयुक्त आहे.
कांदा: कांदा खोकल्यावर गुणकारी आहे. कांद्याच्या रसात मध घालून दिवसातून चार ते पाच वेळा घ्यावा. कफ मोकळा होतो. कांद्याचा रस आणि लिंबाचा रस घेऊन एक कप उकळते पाणी त्यावर ओतावे. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा द्यावे.
बेहडा: बेहडासुध्दा अत्यंत गुणकारी आहे. हिरड्याचे चूर्ण मिरी आणि मध घालून द्यावे. यासाठी हिरड्याला कणीक लावून भाजून मग द्यावा. त्याने सुध्दा खोकला थांबतो.
मनुका: मनुका ही खोकल्यावर गुणकारी आहे. 100 ग्रॅम मनुका पाण्यात वाटाव्या. त्या 100 ग्रॅम साखर टाकावी. नंतर हे मिश्रण पाक घट्ट होई पर्यंत आटवावे. हा पाक 20 ग्रॅम रोज घ्यावा. कफ घट्ट असेल तर तो मोकळा करण्यासाठी विलायती सौफ चा चहा करून घ्यावा.
खोकल्यावर घरगुती उपाय तुम्हाला हा लेख कसा वाटला कृपया कमेंट करून सांगा धन्यवाद।