कावीळ ची लक्षणे

यकृताच्या विकारांपैकी कावीळ या रोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. बाइल हा पाचक रस वाहून नेणाऱ्या नलिकेमध्ये अडथळा आल्यामुळे किंवा बाइल हा पाचक रस निर्माण करणाऱ्या यकृतामधील पेशींचे कार्य थांबल्यामुळे कावीळ होते. कावीळीचे अनेक प्रकार आहेत. परंतु या सर्वांमध्ये त्वचा आणि डोळे पिवळे दिसतात. कावीळ ची लक्षणे

यकृत हा अवयव मध्यपटलाच्या खाली आणि आमाशयाच्या वर असतो. यकृत म्हणजे एक मोठी रासायनिक प्रयोग शाळाच आहे. जे गरज नसलेल्या हार्मोन्सचा नाश करते. पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली अमायनो ऍसिड आम्ले तयार करते. ऊर्जेची गरज असेल तर, प्रथिनांचे साखरे मध्ये आणि चरबीमध्ये रूपांतर करते. लेसिथिन, कोलेस्टेरॉल, बाइल पाचक रस आणि रक्तामधले अल्ब्युमिन तयार करते. ते नाश झालेल्या पेशींचा कचरा साफ करण्यासाठी आवश्यक असते.

बाइल हा महत्त्वाचा पाचक रस आहे. पौष्टिक घटक मिळवण्यासाठी तो आवश्यक असतो. अन्नाच्या पचनासाठी हा पाचक रस आवश्यक असतो. तो अन्न सडू देत नाही. आतड्यांमध्ये वायू निर्माण झाला तर, हा पाचक रस आतड्यांमध्ये पाझरू शकत नाही. एरवी त्याचे स्रवणे आणि ओघ अखंडपणे चालू असतो.

लक्षणे (Kavil Symptoms In Marathi)

काविळ ची लक्षणे मध्ये अतिशय थकवा येतो. डोके दुखते. ताप येतो. भूक लागत नाही. अशक्तपणा येतो. तीव्र बध्दकोष्ठ असते. मळमळ असते. डोळे, जीभ, त्वचा आणि मूत्र पिवळ्या रंगाचे बनतात. 

साधारणतः पावसाची सुरुवात झाली की, कावीळ या आजाराची सुरवात व्हायला लागते.  पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर कावीळची रुग्ण संख्या वाढते. दूषित अन्न किंवा पाणी यामुळे हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. कावीळला संस्कृत मध्ये ‘कामीण’ असे ही म्हणतात. त्याचा अपभ्रंश करत त्याला कावीळ असे नाव पडले. कामला या शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहीसा करणारा आजार असा आहे. कावीळ याला ‘हिपेटायटस बी’ असे ही म्हणतात.

कावीळ ही किती दिवसात बरी होते. त्या आधी तुम्हाला कावीळ ची लक्षणे काय (kavil che lakshan) कारणे, घरगुती उपाय आणि आयुर्वेदीक उपाय यांच्याबाबत माहिती देऊ. जाणून घ्या कावीळ विषयी अधिक सर्व माहिती. 

थकवा जाणवणे (Feeling Restless)

ताप आल्यानंतर थकवा येणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु, तुम्हाला सौम्य ताप आहे पण तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर, तुम्हाला कावीळ ची लक्षणे असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे निष्काळजीपणा न करता याची योग्यवेळी चाचणी करणे गरजेचे आहे. 

बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होणे (Constipation)

बद्धकोष्ठतेचा त्रास ही कावीळ झाल्यानंतर सतत होत असतो. पोटात खडे होऊ लागतात. पोट व्यवस्थित साफ होत नाही. या काळात पोटाची चयापचय म्हणजेच पचन क्रिया बिघडलेली असते. त्याचा परिणाम तुमच्या पोटावर होतो आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास व्हायला लागतो.

लघवी पिवळी होणे (Yellow Urine)

कावीळ मध्ये रक्तातील लाल पेशींचे रुपांतर बिलीरुबीन मध्ये होते. त्यानंतर त्याचे रुपांतर बाईल मध्ये त्यांचे रुपांतर होते. ते लघवीच्या मार्गाने शरीराच्या बाहेर पडते. बिलीरुबीन चे प्रमाण वाढल्यामुळेच लघवी पिवळी होत असते. हे प्रमाण अधिक वाढले तर, लघवी अधिक गडद पिवळी होऊ लागते.

सतत उलट्या होणे (Vomiting)

जर तुम्ही साधा ताप आहे असा समजून घरगुती इलाज करत राहिले तर, तुम्हाला काही दिवसांनी उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. कावीळ मध्ये उलट्या होणे अजिबात चांगले नसते. जर तुम्हाला या काळात उलट्या झाल्या तर, तुम्ही तातडीने त्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे.

पोटाच्या वरील भागात दुखणे (Stomach Pain)

पोटात पित्ताशयाचे खडे झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास कावीळ झाल्यामुळे होते. कावीळ झाल्यानंतर अधून मधून पोट दुखत असते. 

झपाट्याने वजन कमी होणे (Weight Loss)

कावीळ मध्ये काही ही खाण्याची इच्छा होत नाही सर्व इच्छा मरुन जातात. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यामध्ये वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे अधिक अस्वस्थ वाटायला लागते. 

नखे आणि त्वचा पिवळी पडणे (Change In Skin Color)

कावीळ संपूर्ण शरीरात भिनल्यानंतर त्याची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे दिसू लागतात. त्यात नखे इतर वेळी मात्र गुलाबी दिसतात परंतु, पण कावीळ झाल्यानंतर नखे आणि त्वचा पिवळी दिसू लागते.    

डोळे पिवळे दिसणे (Pupil Color Turns Yellow)

ज्या प्रमाणे नखे आणि त्वचा पिवळी दिसते अगदी त्याच प्रमाणे डोळे ही काविळ मध्ये पिवळे दिसू लागतात. कावीळ तपासण्यासाठी तुमचे डोळे आणि नखे तपासली जातात. त्यामुळेच कावीळ झाली आहे असे लक्षात येते.

कावीळ होण्याची कारणे (Causes Of Jaundice In Marathi)

अस्वच्छ पाण्याचे सेवन (Unhygienic Food And Water)

कावीळ हा संसर्गजन्य आजार असून अस्वच्छ पाण्याचे सेवन केल्याने हा आजार होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. पावसाच्या दिवसात अनेक ठिकाणी दूषित पाण्याची समस्या असते. प्रतिकारशक्ती कमी असेल आणि कुठेही पाणी पिले तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

बाहेरचे अधिक प्रमाणात खाणे (Eating More Junk Food)

जर आपल्याला बाहेर खायची सवय जास्त असेल तर, कावीळ होण्याचे हे एक कारण बनू शकते. पावसात बाहेरच्या पदार्थांमध्ये वापरण्यात आलेले पाणी हे अधिक त्रासदायक ठरु शकते. जर सतत बाहेरचे पदार्थ या दिवसात खाल्ले तर, अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

मद्यपानाची सवय (Drinking Alcohol)

मद्यपानाच्या अधिक सेवनामुळे देखील यकृताला सूज येऊ शकते. त्यामुळे देखील कावीळ होऊ शकते. जर मद्याचे अधिक सेवन असेल तर हे देखील कावीळचे कारण ठरु शकते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर मद्यपान करु नका असे सांगितले जाते.

मलेरिया, टायफाईड नंतर होऊ शकते कावीळ (After Malaria And Typhoid)

मलेरिया आणि टायफाईड नंतर आपल्या शरीरातील पेशी कमी होतात. या वेळी कावीळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक असते. आपण बऱ्याच वेळा हे ऐकतो ही की, मलेरिया झाला नंतर कावीळ झाली किंवा टायफाइड झाला नंतर कावीळ झाली तर, हे आपल्या शरीरातील पेशांच्या कारणाने होते. 

कावीळ हे यकृत बिघडल्याचे लक्षण आहे. पाचक रसवाहिनीमध्ये अडथळा आला. तर कावीळ होते. या वाहिनीमधून पाचक रस आतड्यांमध्ये जात असतो. या वाहिनींमध्ये अडथळा आला तर बाइल रक्तामध्ये मिसळते. त्यामुळे त्वचेला पिवळेपणा येतो. पित्ताच्या खड्यामुळे किंवा यकृताच्या शोथामुळे वाहिनीमध्ये अडसर निर्माण होतो. यकृतशोथ विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. हा संसर्गरोग असल्यामुळे अन्नपदार्थ आणि पाणी याद्वारे इतर माणसांमध्ये पसरतो. पर्निसियस रक्तक्षय, टायफाइड किंवा विषमज्वर, मलेरिया, पीतज्वर व क्षयरोग यांमध्ये ही कावीळ होऊ शकते.

कावीळ घरगुती उपचार (Kavil Var Gharguti Upay)

उसाचा रस (Sugarcane Juice)

उसाचा रस हा साधारणतः सर्वानाच आवडतो. इतर वेळी ही बरेच लोक रस आवर्जून पिण्यासाठी जातात. पण कावीळ झाल्यानंतर उसाचा रस प्यायला सांगितला जातो. काविळसाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी घटक आहे. जर तुमच्याकडे उस असेल तर तुम्ही उस चावून ही खाऊ शकतात. पण जर तुमच्याकडे उस नसेल तर, तुम्ही उसाचा रस पिऊ शकतात. उसाच्या रसामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्त तयार होण्याची प्रक्रिया  सुरु होते. तसेच, रोग प्रतिकार शक्ती ही वाढते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर 3 ते 4 ग्लास उसाचा रस नक्की प्यावा.

टोमॅटोचा ज्युस  (Tomato Juice)

टोमॅटोचा ज्युस ही काविळवर गुणकारी असतो. रोज सकाळी उठून तुम्ही एक पेलाभर टोमॅटोचा ज्युस पिला तर अधिक चांगले असेल. टोमॅटोचा जूस हा नुसता पिणे शक्य नसेल तर त्यात मीठ आणि मिरपूड घालावे त्यामुळे तोंडाला चव येईल म्हणजेच तुम्ही टोमॅटो सूप बनवून पिऊ शकतात. 

मुळ्याचा ज्युस (Raddish Juice)

काविळमध्ये काही ही खाण्याची आणि पिण्याची इच्छा मरुन जाते हे आधीच सांगितले. पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी चांगला आहार घेण्याची देखील अधिक गरज असते. पण या दिवसात भूक लागत नाही म्हणूनच, तुम्ही मुळ्याचा ज्युस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा ही रस प्यायलाने पोट साफ होते आणि भूक ही लागते. त्यामुळे किमान एक ग्लासभर तरी मुळ्याचा ज्युस प्यावा.

पपईच्या पानांचा ज्युस (Papaya Juice)

पपईच्या पानांचा ज्युस हा अनेक आजारांवर गुणकारी आहे. पपईची कोवळी पाने ग्राइंड करून हा ज्युस केला जातो. पपईच्या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते म्हणूनच, पपईच्या पानांचा ज्युस या  दिवसात घ्यावा असा सल्ला दिला जातो. लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला पपईची कोवळी पाने यासाठी निवडायची आहे.

भिजलेले मनुके (Soaked Raisin)

तुमच्या शरीरातील उर्जा वाढण्याचे काम ड्रायफ्रुट करु शकते. त्यातल्या त्यात ड्रायफ्रुट मधील मनुके कावीळसाठी चांगले असतात. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ते सकाळी खा. काविळनंतर साधारण 15 ते 20 दिवस मनुक्यांचे सेवन करा.

तुळशीची पाने (Basil Leaves)

तुळशीच्या पानातील औषधी तत्व कावीळ बरी करण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे शक्य असल्यास या दिवसात पाने चावून खावी. एकावेळी तुम्ही 7 ते 8 पाने चावून खाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. शिवाय कावीळ कमी होण्यास मदत होईल.

आवळ्याचा ज्युस (Aamla Juice)

काविळवर आवळ्याचा जूस गुणकारी असतो. कावीळ झाल्यानंतर एकदा तरी आवळ्याच्या ज्युसचे सेवन करावे.

लिंबाचा रस (Lemon Juice)

काविळमध्ये यकृताला त्रास होतो. यकृताचे कार्य पूर्ववत आणि चांगले करण्यासाठी लिंबाचा रस मदत करु शकते म्हणून, दिवसातून 2 ते 3 वेळा लिंबाच्या रसाचे सेवन करणे अधिक चांगले आहे यामुळे आराम पडेल.

निसर्गोपचार, आहार आणि व्यायाम यामुळे सौम्य स्वरूपाची कावीळ लगेच बरी होऊ शकते. वाहिनीमध्ये अडथळा आल्यामुळे किंवा वाहिनीवर दाब पडल्यामुळे कावीळ झाली असेल तर, सुधारणा व्हायला वेळ लागतो. लक्षणे कमी होईपर्यंत किंवा रोग आटोक्यात येईपर्यंत रुग्णाने संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे.

सुरुवातीला एक आठवडा रुग्णाने फलाहार घेऊन लंघन करावे. या काळात वरती सांगितल्या प्रमाणे लिंबू, पेअर, गाजर, बीट, उस इतर रस घ्यावा. रोज गरम पाण्याचा एनिमा घ्यावा. त्यामुळे पोट साफ होते आणि सडलेल्या विषारी पदार्थांचे शोषण रोखले जाते. लक्षणे कमी झाल्यानंतर लंघन बंद करून साधा आहार खालील प्रमाणे सुरू करावा.

सकाळी उठल्यावर: पेलाभर गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून घ्यावा

नाश्ता: सफरचंद, पपई, बेरी, आंबा यापैकी एक फळ, एक कप शिजवलेला गव्हाचा भरडा किंवा कोंड्यासकट कणकेची पोळी, लोणी.

मध्यसकाळी: संत्र्याचा रस

दुपारचे जेवण: कोंड्यासकट कणकेच्या दोन पोळ्या. एक कप गाळून घेतलेला भाजीचा रस, पालकासारखी वाफवलेली पालेभाजी आणि ताक

संध्याकाळी: संत्र्याचा रस किंवा शहाळाचे पाणी

रात्रीचे जेवण: कोंड्यासकट कणकेच्या दोन पोळ्या, तूप किंवा लोणी, भाजलेला बटाटा, वाफवलेल्या पालेभाज्या उदा. पालक, कोथिंबीर, मध घालून दूध (ऐच्छिक). तूप, लोणी, साय, तेल दोन आठवडे तरी खाऊ नये. नंतर योग्य प्रमाणात खावे. अपचन राळावे. उसळी, कंदमुळे यामुळे आतड्यांमध्ये अन्न आंबते म्हणून हे पदार्थ खाऊ नयेत.

कावीळीवर कडू दोडका हे उत्तम घरगुती औषध आहे. दोडक्याचा रस काढावा. बाहेर पडू लागतो. विषारी पदार्थ बाहेर पडल्याने रुग्णाला लगेच बरे वाटू लागते. पण हा तळहातावर घेऊन नाकाने ओढावा. त्या बरोबर नाकातून पिवळा द्रव मोठ्या प्रमाणात अतिशय तीव्र आहे. त्यामुळे कधीकधी चक्कर येणे, अर्धशिशी, ज्वर अशी लक्षणे दिसतात. म्हणून अशक्त रुग्णांवर हा प्रयोग करू नये. 

ताजा दोडका मिळाला नाही तर, त्याची वाळलेली साल रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे तीन थेंब नाकात टाकावे किंवा दोडक्याच्या बिया पाण्यात वाटून त्याचा रस काढून नाकाने ओढावा. मूळ्याची लाल पाने हे सुध्दा चांगले गुणकारी आहे. पानांचा रस वाटून गाळून घ्यावा. एक ग्लास रस रोज घ्यावा. यामुळे लगेच फरक पडतो. भूक लागते. मलविसर्जन साफ होते व काविळीला उतार पडतो. काही रुग्णांना आठ ते दहा दिवसात पूर्णपणे बरे वाटते.

जलचिकित्सा

लिंबाचा रस टाकून भरपूर पाणी पिल्याने यकृताच्या पेशींचे संरक्षण होते. पोटावर अदलून बदलून उष्ण आणि थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. गरम पाण्याच्या घडीचे तापमान 120 डि.फॅ. असावे. ही घडी एक मिनिटभर ठेवावी. असे एक तास किंवा दहा आवर्तने कारावी. दर पाच तासांनी पुन्हा करावे. 104 डि.फॅ. तापमानाच्या पाण्यात दहा मिनिटे बसावे. त्यामुळे अंगाची खाज कमी होते. रक्तामध्ये मिसळलेले बाइल त्वचेमधून आणि मूत्रपिंडातून बाहेर पडायला याने मदत होते. थंड पाण्याच्या टॉवेलने दिवसातून दोन वेळा शरीर खसाखसा चोळून काढावे. उत्तानपादासन, भुजंगासन, विपरितकरणी, शवासन ही आसने व अनुलोम-विलोम हा प्राणायाम करावा.

वरील उपचार केल्याने कावीळ बरी होऊन लवकरच यकृताचे कार्य सुधारते. संतुलित आहार, व्यायाम, सूर्यस्नान, मोकळी हवा, या गोष्टी नियमित पाळल्या तर पुन्हा काविळ होत नाही.

कावीळ ची लक्षणे तुम्हाला हा लेख कसा वाटला कृपया कमेंट करून सांगा धन्यवाद।

Leave a Reply