दात दुखीवर घरगुती उपाय
दात दुखीवर घरगुती उपाय बरेच आहेत आमच्या या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला दात का दुखतात, त्याची काय लक्षणे असतात आणि त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्या विषयी सांगणार आहोत त्यासाठी आमचा हा पूर्ण लेख वाचा.
दात दुखणे ही सर्वांसाठी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठी समस्या झालेली आहे. अचानक दातदुखीचा त्रास (Toothache) आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल. साधारतः दात किडल्याने दात दुखीचा त्रास उद्भवतो. आपली दैनंदिन जीवनशैली, आहार, मानसिक तणाव या सारख्या गोष्टींमुळे ही दातांच्या समस्या होतांना दिसत आहेत. दात लवकर पडण्याचे कारण, दात किडणे हे असते. दातांवर एनॅमल आणि डेन्टिन त्याचे कवर असते. त्यांची जिवाणूंमुळे निर्माण झालेल्या ऍसिड मुळे झीज होते. यालाच आपण दात किडणे म्हणतो आणि यामुळेच दात दुखी ही होते.
आधुनिक युगात खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. दात हा आकार, कार्य, सौंदर्य आणि रचना यांचे एक अद्भुत संगम आहे. आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने दातांचे अधिक महत्व आहे. अन्नाच्या पचन कार्यासाठी दातांचा फार मोठा वाटा आहे. दात सुंदर असतील तरच हास्य देखील अधिक सुंदर असते म्हणून, दातांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
लक्षणे
अगदी सुरवातीला थंड किंवा गरम पदार्थामुळे दात दुखू लागतो. अगदी चवतांनासुद्धा त्रास होतो. नंतर दाताच्या मुळाशी पू साचतो आणि मोठा ठणका लागतो. घण मारल्यासारख्या वेदना होतात. योग्य इलाज झाला नाही तर दात काढावा लागतो.
कारणे
अयोग्य आहारामुळे दात दुखी होते आणि दात किडतात. शीत पेय, केक, पेस्ट्रीज, मिठाई, साखर आणि मैद्याचे पदार्थ खाल्याने ही दात किडतात आणि दुखतात. आहारामध्ये कर्बोदके आणि प्रथिने यांचे प्रमाण प्रमाणात नसेल तसेच, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा अभाव असेल तर, दात लवकर किडतात.
लवंग तेल (Clove Oil)
दात दुखीवर घरगुती उपाय, तुम्ही कापसाच्या मदतीने लवंग तेल वापरावे हे तेल पोटात जाऊ देऊ नये याची काळजी घ्या. थोडा वेळ दुखत असलेल्या दाताला लवंग तेल लावलेला कापूस लाऊन ठेवा नंतर चूळ भरा. दिवसातून तुम्ही हा प्रयोग साधारण तीन ते चार वेळा करू शकतात. यामुळे दातदुखी कमी होण्यास मदत मिळेल. या शिवाय दुखत असलेल्या दाता जवळ तुम्ही अख्खी लवंग ही ठेऊ शकतात. काही वेळातच दात दुखी कमी होण्यास मदत होते.
हे कसे ठरते फायदेशीर?
दात दुखीवर घरगुती उपाय म्हटले की, सर्वात प्रथम लवंग हा एकमेव घरगुती उपाय आपल्याला दिसतो. वास्तविक एन सी बी आय च्या अभ्यासानुसार, लवंग अथवा लवंग तेलाचा एका आयुर्वेदिक औषधा प्रमाणे उपयोग होतो. लवंगाच्या तेलामध्ये मुख्य घटक युजेनॉल आणि अॅसिटिल युजेनॉल असल्यामुळे हे एक अॅटिइन्फ्लेमटरी आणि अॅनाल्जेसिक औषध म्हणून काम करते. त्यामुळे दातदुखीवर रामबाण उपाय म्हणून, याचा उपयोग होतो. अर्थात संपूर्णतः जरी दातदुखी बंद झाली नाही तरी ही डॉक्टरकडे जाऊन दाखवेपर्यंत तरी किमान लवंग तेलाचा उपयोग करून दुखणे कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकतात. पण याचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर करू नये.
आल्याची पावडर (Ginger Powder)
आल्याची पावडर आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट दातामध्ये दुखत असेल त्या भागाला लावावी. थोडा वेळ तसंच राहू द्यावे आणि नंतर चूळ भरा. तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही आल्याचे लहान लहान तुकडे करा आणि दात दुखत असेल त्या भागात ठेवा. तरी ही तुमच्यासाठी चांगले असेल.
हे कसे ठरते फायदेशीर?
दात किंवा दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय (dad dukhi var upay) हवा असेल तर, आल्याचा तुम्हाला फायदा करून घेता येईल. एन सी बी आय च्या अभ्यासानुसार, आल्याची पावडर तितकीच उपयोगी ठरते जितकी आयबूप्रोफेनिन (पेनकिलरचे नाव) तुम्हाला त्रासातून मुक्त करते. दाताला कोणती ही जखम झाली अथवा हिरड्या सुजल्या नंतर ही तुम्ही आल्याचा उपयोग करून घेऊ शकतात. दाताच्या हलक्या फुलक्या त्रासावर आल्याचा तुम्हाला घरगुती उपायांमध्ये उपयोग करून घेता येतो. केसांसाठी आणि आरोग्यासाठी ही आल्याचे फायदे होतात.
हिंग (Hing)
हिंगामध्ये पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या मग ही पेस्ट दातदुखीवर कापसाच्या मदतीने लावा. दात दुखायला लागल्यास तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
हे कसे ठरते फायदेशीर?
दात दुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामध्ये दात दुखी कमी करणारे गुण सापडतात. तसंच या मध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. बॅक्टेरियामुळे किडलेल्या दातांना वाचविण्यासाठी आणि दातदुखीपासून सुटका करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिंग दातावर औषधा प्रमाणे काम करते.
कांदा (Onion)
कांद्याची साले काढून त्याचे तुकडे करून घ्यावेत. कांद्याचा तुकडा दातावर ठेवावा आणि काही वेळ तसाच राहू द्यावा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करावा. दातदुखी थांबायला मदत मिळते.
हे कसे ठरते फायदेशीर?
कांदा केवळ खाण्यामध्ये स्वादच आणत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी आणि दातासाठी ही फायदेशीर ठरतो. दात दुखीवरील घरगुती उपायांमध्ये कांदा उपयुक्त ठरतो. या मध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण तोंडातील बॅक्टेरियावर परिणामकारक ठरतात. तसंच कांदा एक नैसर्गिक औषध असून याचा कोणता ही तोटा दात दुखीवर होत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त वापरू शकतात. तसेच कांदा पोटात गेला तरी ही त्याने काही त्रास उद्भवत नाही.
लसूण (Garlic)
लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. त्यामध्ये सेंध मीठ मिक्स करा. ही पेस्ट जो दात दुखत असेल तिथे लावा. दुखायचे कमी होईलच परंतु, कमी झाले नाही तर दिवसातून दोन वेळा तुम्ही ही पेस्ट लावू शकतात नक्कीच गुणकारी असेल.
हे कसे ठरते फायदेशीर?
लसणाचे अनेक फायदे आहेत यामध्ये काहीच शंका नाही. त्यामध्येच दातदुखी वरील घरगुती उपचारात ही लसूण उपयोगी ठरते. वास्तविक लसणामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे दाताच्या प्लाकवर अधिक परिणामकारक ठरतात. अँटिबॅक्टेरियल गुणांमध्ये असलेले महत्वपूर्ण घटक ऍलिसीन असल्याचे समजण्यात येते. तसंच यामध्ये अँटिमायक्रोबियल गुण असून हिरड्यांवरील संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियांपासून वाचण्यास मदत मिळवून देते. अनेक ‘टूथपेस्ट’ अथवा माऊथवॉशमध्ये ही लसणाचा उपयोग केला जातो. तुम्ही याचा पण वापर करू शकतात.
मीठाचे पाणी (Salt Water)
एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये मीठ मिक्स करा. याच्या गुळण्या करा. दुखत असलेल्या दाताला हे पाणी लागायला हवे.
हे कसे ठरते फायदेशीर?
दातदुखी सुरू झाल्यानंतर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे. यामुळे दातदुखी पटकन थांबायला मदत मिळते. मीठाच्या पाण्यामुळे दातातील कीड कमी व्हायला सुरवात होते किंवा मदत मिळते. हे दातदुखी वरील औषध नाही. कायमस्वरूपी औषध तुम्हाला डॉक्टरांकडूनच मिळते. पण तात्पुरती दातदुखी बंद करण्यासाठी याचा तुम्ही हमखास उपयोग करून घेऊ शकतात.
पेरूची पाने (Guava Leaves)
पेरूची पाने तुम्ही पाण्यात उकळून घ्या आणि मग ते पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्या पाण्यात मीठ घाला आणि मग पाणी कोमट झाल्यावर त्याने चूळ भरा. दातदुखी पासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही पेरूची पाने चावू ही शकतात. लक्षात ठेवा तुम्ही पेरूची पाने स्वच्छ करून नंतरच त्याचा उपयोग करा.
हे कसे ठरते फायदेशीर?
दात दुखीवर घरगुती उपाया (dat dukhi var gharguti upay in marathi) यामध्ये तुम्ही याचा समावेश करून घेऊ शकतात. एका अभ्यासानुसार, पेरूच्या पानांमध्ये ‘गआजावेरीन’ नावाचे अँटप्लाक गुण आढळतात. जे तोंडाच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. तसेच पेरूच्या पानामध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेटरी, एनाल्जेसिक गुण देखील आढळतात. जे दातदुखीपासून तुम्हाला दूर ठेवतात. तसेच यामुळे तोंडाचा अल्सर आणि दाताचे दुखणे दोन्ही कमी होते.
नायजेला सीड्स (Nigella Seeds)
नायजेला सीड्सचे तेल अर्थात कलौंजी तेलामध्ये क्यू टिप अथवा इअर बड भिजवून घ्या. दुखत असलेल्या दाताच्या भागाला लावा आणि मग नंतर थोड्या वेळात दात घासून घ्या. अथवा कोमट पाण्यात हे तेल घालून तुम्ही माऊथवॉश प्रमाणे याचा उपयोग करून घेऊ शकतात.
हे कसे ठरते फायदेशीर?
नायजेला सीड्समध्ये थामोक्विनोन नावाचे एनाल्जेसिक गुण आढळतात. दातदुखी पासून सुटका मिळवून देण्यासाठी याचा चांगला वापर करून घेता येतो. या शिवाय हे तेल पेनकिलर प्रमाणे काम करते. त्यामुळे दातदुखी पासून पटकन सुटका मिळते.
तसेच, हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी लिंबू आणि मोसंबी खावी. या दोन्ही फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. क जीवनसत्त्वामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांना हे जीवनसत्त्व जंतुसंसर्गापासून वाचवते. म्हणून मुलांच्या आहारात ही दोन्ही फळे असावीत.
दातांना किडण्यापासून प्रतिबंध करायचा असेल तर, काय खावे आणि काय खाऊ नये हे जसे महत्त्वाचे असते तसेच केव्हा खावे हे सुध्दा महत्त्वाचे असते. दिवसातून अनेक वेळा खाणे दातांना अपायकारक आहे. त्यामुळे तोंडात ऍसिड निर्माण होते. त्यामुळेच दातावर किटण जमा होते. त्यामुळेच दात किडतात म्हणून, मिठाई, अधेमध्ये केव्हा ही खाण्यापेक्षा जेवणाच्या शेवटी खावी.