पोट कमी करण्याचे उपाय
पोट कमी करण्याचे उपाय तसे तर, अनेक मार्ग आहेत. परंतु आम्ही तुम्हाला या पोस्टच्या मदतीने त्यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि पोट वाढण्याची महत्त्वाची कारणे देखील समजावू. पोट कसे कमी करायचे उपाय ते मराठीत वाचा-
पोट वाढणे ही सामान्यतः लोकांच्या घरातील कॉमन समस्या आहे. आपण प्रत्येक दुसऱ्या घरातील व्यक्ती पाहतो की, ज्याचे पोट वाढलेले आहे किंवा शरीरात अधिक फॅट्स आहेत आणि त्यामुळे शरीर स्थूल झालेले आहे तर, प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते उदा, असंतुलित जेवण, व्यायाम, दिनचर्या, शरीराकडे नीट लक्ष न देणे, धकाधकीचे जीवन अजून बरेच काही. साधारणतः तिशी नंतर पोट वाढण्याची समस्या सुरु होते. बरेच लोक गोड पदार्थ, दूध, तूप, मलाई सारखे चरबी वाढवणारे पदार्थ खात नाहीत तरी, ही त्यांचे वजन आपल्याला वाढलेले दिसते मग, तरी ही पोट का सुटते? बरेच लोक नियमित ३-४ किमी नियमित जोरात चालतात आणि काही नियमित व्यायाम करतात, काही स्वीमिंग करतात त्यांचे ही पोट सुटलेले दिसते मग, प्रश्न पडतो की, इतके करून ही पोट वाढणे ही समस्या का आहे? तर, या प्रश्नाचे एकच उत्तर आहे की, शरीरामध्ये वाढलेले “इन्सुलिन” या संप्रेरकाचे अतिरिक्त प्रमाण!
हो! तर, इन्सुलिनचे अतिरिक्त प्रमाण शरीरात वाढले की, ते अतिरिक्त चरबी वाढवण्याचे काम करते आणि इन्सुलिन मुळे डायबिटीस आणि हार्ट अटॅक सारख्या समस्या ही अधिक वाढतात.
“इन्सुलिन” हे शरीरात अधिक वाढण्याचे काय कारण असेल?
इन्सुलिन आपल्या शरीरात दोन प्रकारे तयार होत असते एक तर, शरीरात दिवसभरात नैसर्गिकरित्या तीस ते बत्तीस युनिट तयार होते, हे आपल्याला जिवंत राहण्यासाठी गरजेचे असते. हे आपण कमी करू शकत नाही. तर, दुसरे कारण म्हणजे जेव्हा आपण दिवसभर जे खातो किंवा पितो (पाणी वघळता) तेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन तयार होत असते. प्रत्येकाच्या शरीरावर त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, आपण सकाळी साखरयुक्त चहा किंवा दूध घेतले तर, एखाद्याचे इन्सुलिन प्रमाण हे दोन युनिट असू शकते तर, काहींचे पाच ही असू शकते. हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असते. अश्याच, प्रकारे जेव्हा आपण दिवसभर सतत काही न काही खात असतो तेव्हा शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते म्हणूनच, आपल्याला अशी उलटी उदाहरणे ऐकायला किंवा पाहायला मिळतात की, कमी खाणाऱ्या लोकांचे पोट अधिक खाणाऱ्या लोकांपेक्षा अधिक असते. याचे कारण, इन्सुलिनचे प्रमाणच एखाद्या व्यक्तीमध्ये नैसर्गिकरित्या अधिक असते.
वाढलेले इन्सुलिन शरीराला कश्या प्रकारे इजा पोहचवते?
आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा शरीर तीन प्रकारे मिळवते.
१. ग्लुकोज
२. यकृतामध्ये साठवलेले ग्लायकोजन (लिव्हर)
३. चरबी जाळून मिळणारी ऊर्जा
ह्या तीन प्रकारे शरीर ऊर्जा मिळवत असते. आपल्या शरीरातील पेशी या सर्वात प्रथम आपल्या रक्तातील ग्लुकोज पासून ऊर्जा मिळवतात. ग्लुकोज वापरून झाले की, ते यकृतातील ऊर्जा वापरली जाते. हे दोन्ही संपले की, ते चरबी जाळून मिळणारी ऊर्जा घेतात. इन्सुलिनमुळे आपले शरीर हे ग्लुकोज वापरते. आपल्या शरीरातील पेशींना अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी जाळायला खूप आवडते कारण, चरबी पासून नऊ कॅलरी ऊर्जा मिळते तर, त्यांना एका ग्लुकोज पासून चार कॅलरी ऊर्जा मिळते परंतु, आपल्या शरीरातील इन्सुलिनचे वाढलेले प्रमाण शरीराला अधिक ग्लुकोज वापरायला सांगते यामुळे, चरबी जाळणारी ऊर्जा आपण तयारच करत नाही. आपल्या नेहमीच्या अधून मधून खाण्याच्या सवयी या ग्लुकोजचे प्रमाण वाढवते यामुळे शरीराला ही सवय लागते आणि ते फक्त इन्सुलिनच तयार करते आणि आपल्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढायला सुरवात होते आणि मधुमेह होतो.
साधारण तिशी पर्यंत बऱ्याच जणांचे पोट का सुटते?
चोवीस ते पंचवीस वर्षा पर्यंत मुलांमध्ये आणि मुलींमध्ये इतर हार्मोन्स रक्तात धावत असतात आणि बरेच, हार्मोनल बदल हे तरुण तरुणींमध्ये होत असते यामुळे चरबी वाढत नाही परंतु, जसे जसे वय वाढत जाते तसे तसे त्याचे हार्मोन्स चे प्रमाण कमी कमी होऊन चरबी वाढायला सुरवात होते. आता आपल्या लक्षात आले असेल की, गोड पदार्थ न खाता ही चरबी वाढते आणि पोट सुटते. पोळी आणि भट यामध्ये अधिक ग्लुकोज असते यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढल्याने ते शरीराला स्थूल बनवत असते. बरेच व्यक्ती हे कधी ही पिझ्झा, बर्गर सारखे फास्ट फूड खात नाहीत तरी ही अवास्तव वाढतात त्याचे हे उदाहरण आहे.
इन्सुलिन आपल्या शरीरात कसे काम करते?
आपण काही ही खाल्ले तरी, अगदी एक शेंगदाणा खाल्ला तरी इन्सुलिनचे एक माप पडते. या नंतर तुम्ही पंचावन्न मिनिटांपर्यंत काही ही खाल्ले तरी दुसरे माप पडत नाही म्हणजे तुमच्या शरीरातील ग्लुकोज किंवा इन्सुलिन हे वाढत नाही म्हणून, आपण एकदा जेवणास बसले की, पोटभर जेवणे गरजेचे आहे यामुळे शरीर संतुलित राहते आणि पोट संबंधित समस्या ही होत नाहीत.
पोट कमी करण्याचे उपाय काय आहेत? – Pot Kami Karayache Upay
१. पोट कमी करण्यासाठी सर्वप्रथम जेवणाची वेळ ही नियमित असावी आणि जेवण दोनच वेळा करणे गरजेचे आहे जर आपण नियमित दोनच वेळा नीट जेवण करून अधून मधून काही ही खाल्ले नाही तर, लवकरच पोटावरची चरबी कमी होईल.
२. सकाळी उठल्यावर अनेशापोटी गरम पाणी, मध आणि लिंबू चे मिश्रण पिल्याने ही पोटावरची चरबी लवकर कमी होते.
३. नियमित सकाळी आणि संध्याकाळी ३० मिनिटे ब्रिक्स वॉक जे डॉक्टर सर्वानांच सांगत असतात हे करणे गरजेचे आहे. ब्रिक्स वॉक म्हणजे भरभर चालणे.
४. नियमित पोटासाठीचे व्यायाम करणे जे आपण रामदेव बाबांच्या व्हिडीओ मधून ही सहज पाहून करू शकतो. पाहिऱ्या चढणे आणि उतरने हा ही पोटासाठी उत्तम व्यायाम आहे परंतु, याचे अति प्रमाण करणे ही चुकीचे आहे.
५. मांसाहार वर्ज केल्याने ही पोट लवकर कमी होते तसेच, धूम्रपान आणि मद्यपान बंद करा.
७. आपले बैठे काम असेल तर, प्रत्येक तासाला ब्रेक घेऊन १० ते १५ मिनिटे चाला.
८. दुधाचा पूर्णपणे चहा बंद करून, ब्लॅक टी किंवा ग्रीन टी सुरु करा.
९. तेलकट – तुपकट,अतिगोड, तसेच थंड पदार्थ खाणे टाळा.
१०. रात्रीचे जेवण ९ वाजेच्या आत करा आणि जेवण झाल्या-झाल्या लगेच झोपू नका. जेवणानंतर वज्रासन केल्यास फायदा होतो.
अश्या प्रकारे आपण सवय लावून घेतली आणि पोट कमी करण्यासाठी गंभीर विचार केला तर, नक्कीच पोटाचा घेर लवकर कमी होईल.
देखील वाचा – कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे